शाळेतील सुविधा



 

मुलांसाठी खेळण्याचे मैदान

शिक्षणावर भर देताना शाळा प्रशासनाने क्रीडा प्रकारांकडे सुद्धा लक्ष दिले असल्यामुळे शाळेतील खेळाडू निर्माण होण्याची प्रक्रिया घडत आहे. शाळेत शिकत असतानाच विद्यार्थ्यांना विविध खेळांविषयी आवड निर्माण करण्यास आमची शाळा अग्रेसर प्रयत्न करत आहे



मुलांचे वसतिगृह

दूर-दूरच्या गावांतील किंवा गरजू कुटुंबांतील मुला-मुलींना शिक्षणासाठी सोयीस्कर राहण्याची व्यवस्था आमच्या शाळेत वसतिगृह द्वारे केली असून मुला-मुलींना सुरक्षित आणि देखरेखीखाली राहण्याची सोय होते तसेच मनोरंजनासाठी सभागृह,सिकरूम,अभ्यास कक्ष,भोजन कक्ष आदी सुविधा येथे करण्यात आले आहे



अभ्यासिका

शिक्षकाला सामाजिक अभियंता असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही,ज्याप्रमाणे अभियंता नवीन इमारत नवीन काही निर्मिती करतो,त्याचप्रमाणे आदर्श समाज बांधण्याचे कार्य शिक्षकही करतो त्याकरिता अत्याधुनिक आणि शिक्षणास उपयोगी असे सर्व समावेशक वर्ग खोल्या सर्व वर्गाला करण्यात आल्या आहे



सोलर सुविधा

वसतिगृहांमध्ये सौर पाणी गरम करण्याची प्रणाली (solar water heater) वापरणे, ही ऊर्जा वाचवण्याची आणि पर्यावरणाची काळजी घेण्याची एक चांगली पद्धत आहे. सौर ऊर्जेचा वापर केल्याने वीज खर्च कमी होतो आणि पाणी गरम करण्यासाठी लागणारा वेळही वाचतो.



संगणक कक्ष

आमच्या शाळेत सुसज्ज संगणक प्रयोगशाळा निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये नवीनतम तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.मल्टीमिडीया सह संगणक.वैयक्तिक UPS,प्रिंटर,स्कॅनर आणि सर्व LAN वर कार्यरत आहे.विध्यार्थी आणि कर्मचार्यांसाठी इन्टरनेट सुविधा उपलब्ध आहे.



पाण्याची शुद्धीकरण सुविधा

वसतिगृहांमध्ये RO वॉटर फिल्टर बसविण्यात आल्यामुळे शाळेतील व वसतिगृहातील मुला मुलींना स्वच्छ पाणी पिण्यास मिळते. RO वॉटर फिल्टर पाण्यातील हानिकारक घटक आणि जीवाणू काढून स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवतात. RO वॉटर फिल्टर (Reverse Osmosis) ही एक जल शुद्धीकरण प्रक्रिया आहे जी पाण्यातील हानिकारक घटक काढून टाकते, ज्यामुळे ते पिण्यासाठी सुरक्षित होते.




Admission Enquiry
2025